Skip to content

Practice question

Question

Directions For Questions
व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे; पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते आवडलेलं असतं. पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते. अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रे ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं 'येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक 'आई' विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.
व्यंगचित्र ही कशी भाषा आहे?

Options

Choose one · Correct answer highlighted

Explanation

सांगता म्हणजे समाप्ती, अंत, समापन हे सर्व समानार्थी आहेत, म्हणून सर्व बरोबर आहे.

Discussion

Comments

0 comments

No comments yet. Be the first to start the discussion.